सरकारनामा ब्यूरो
लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे हे तीनदिवसीय अमेरिका दौऱ्यावर आहेत.
यादरम्यान ते अमेरिकेचे लष्करप्रमुख जनरल रँडी जॉर्ज यांची भेट घेणार आहेत.
इतर अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही या वेळी ते भेटणार आहेत.
अमेरिकेतील लष्कराकडून गार्ड ऑफ ऑनरने त्यांचे स्वागत करण्यात येईल.
अमेरिकेच्या शहिदांना या वेळी ते श्रद्धांजली वाहणार आहेत.
भारतीय लष्कराच्या आधुनिकीकरणाशी संबंधित मुद्दे, तसेच अनेक विषयांवर ते चर्चा करणार आहेत.
दोन्ही देशांमधील जागतिक शांतता आणि सुरक्षिततेसाठी वचनबद्धतेचे हे प्रतीक असणार आहे.
दोन्ही देशांमधील विचारांची आदान-प्रदान तसेच एकजुटीची भावना निर्माण करणारी ही भेट ठरणार आहे.
जनरल रँडी जॉर्ज आणि इतर वरिष्ठ लष्करी नेत्यांसोबत त्यांची उच्चस्तरीय चर्चा होणार आहे.
R