Rashmi Mane
देशातील सर्वाधिक लोकप्रिय सोशल सिक्युरिटी स्कीममध्ये आता 8.34 कोटींहून अधिक नागरिक जोडले गेले आहेत. महिलांचा 48% सहभाग ही योजनेवरील वाढती विश्वासार्हता दर्शवतो.
अटल पेन्शन योजना 2015 मध्ये असंघटित क्षेत्रातील कामगारांना निवृत्तीनंतर आर्थिक आधार देण्यासाठी सुरू झाली. 18–40 वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक या योजनेत सहभागी होऊ शकतो.
60 वर्षांनंतर दरमहा 1,000 ते 5,000 रुपये गारंटीड पेन्शन मिळते. भविष्यात 10,000 रुपये पेन्शन स्लॅब सुरू करण्याचेही संकेत.
योजनेत पती आणि पत्नी दोघे स्वतंत्र APY खाते उघडू शकतात. दोघांनी 5,000 रुपये पेन्शन स्लॅब निवडल्यास 10,000 पेंशन रक्कम होईल.
वयाप्रमाणे हप्ता ठरतो. उदा. 25 वर्षे वय असताना 5,000 किती करावा लागतो मासिक हप्ता? स्लॅबसाठी फक्त 376 रुपये प्रतिमहिना भरावे लागतात.
जितके लवकर गुंतवणूक, तितका कमी हप्ता!
बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये आधार व मोबाईल नंबर देऊन खाते उघडता येते.
बहुतांश बँकांमध्ये इंटरनेट बँकिंगद्वारे ऑनलाइन नोंदणीची सुविधाही उपलब्ध.
विवाहित असल्यास जोडीदार आपोआप नॉमिनी ठरतो.
खातेधारकाचे निधन 60 वर्षांपूर्वी झाल्यास, जोडीदार योगदान सुरू ठेवू शकतो किंवा 60 वर्षांनंतर पेंशन घेऊ शकतो.
धारा 80CCD(1) अंतर्गत कर सवलत मिळते, जी 80C च्या 1.5 लाख मर्यादेत येते.
गंभीर आजार किंवा मृत्यूच्या प्रकरणात पूर्ण रक्कम परत मिळते.