Rashmi Mane
दूरसंचार विभागाने (DoT) मोठा निर्णय घेतला आहे. आता भारतातील प्रत्येक नवीन मोबाइल फोनमध्ये ‘संचार साथी’ अॅप प्री-इंस्टॉल असणे बंधनकारक असेल असा निर्णय काढण्यात आला होता.
मोबाईल सुरू करताच हे अॅप दिसणार डिलीट करता येणार नाही, ना डिसेबल करता येणार नाही.
जे फोन आधी विकले गेलेत, त्यामध्ये हे अॅप सॉफ्टवेअर अपडेटद्वारे उपलब्ध करून दिले जाईल. म्हणजे देशातील सर्व फोनमध्ये हे अॅप अनिवार्य होणार आहे असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र...
वाढत्या विरोधानंतर अखेर केंद्रीय टेलिकॉम मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी भूमिका स्पष्ट करत माघार घेतली. त्यांनी सांगितले की संचार साथी अॅप अनिवार्य नसून हवे असल्यास ते मोबाईलवरून काढून टाकता येते.
हे सरकारचे सायबर सिक्युरिटी टूल आहे. 2023 मध्ये वेब पोर्टल म्हणून सुरुवात झाली आणि 17 जाने 2025 रोजी अॅप लाँच करण्यात आले. Android आणि iOS दोन्हीवर मोफत उपलब्ध.
अॅप मोबाईल नंबर, OTP आणि फोनचा IMEI वापरून तुमच्या डिव्हाइसला DoT च्या CEIR डेटाबेसशी जोडते. फोन वैध आहे की चोरीचा, ब्लॅकलिस्टेड आहे का – त्वरित माहिती मिळते.
• चोरी/हरवलेला फोन ब्लॉक किंवा ट्रॅक
• तुमच्या नावावर किती SIM आहेत याची माहिती
• कोणते IMEI वैध किंवा ब्लॅकलिस्ट ते तपासता येते
• सेकंड-हँड फोन खरेदी करताना अत्यंत उपयोगी
बँक अधिकारी बनून OTP मागणे, KYC अपडेटचा बहाणा, लॉटरी, फसवे कुरिअर कॉल, अशा फसवणुकीच्या नंबरची तक्रार थेट अॅपमधून करू शकता.