Amol Sutar
दिलबाग सिंग हे हरियाणातील इंडियन नॅशनल लोक दल (INLD) चे माजी आमदार आहेत. ते 2009 मध्ये निवडून आले होते. मात्र 2019 मध्ये त्यांचा पराभव झाला.
गुरुवारी ईडीने मारलेल्या छाप्यात 5 कोटी रुपयांच्या 500 रुपयांच्या नोटा सापडल्या. अजून मोजणी सुरू असून नोटा मोजताना ईडीच्या अधिकाऱ्यांची दमछाक होत आहे.
दिलबाग सिंह याच्या घरातून विदेशी शस्त्रे आणि 300 जिवंत काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत.
दिलबाग सिंह यांच्या निवासस्थानाहून 5 किलोहून आधिक सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आले आहे.
आगामी निवडणुकीत दिलबाग सिंह हे हरियाणातील सर्वात श्रीमंत उमेदवारांपैकी एक होते. त्यामुळे त्यांच्याकडे विरोधी पक्षाचे बारकाईने लक्ष होते.
दिलबाग सिंग यांनी 34 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती. त्यांचा वाहतूक आणि खाणकामाचा व्यवसाय आहे. ते कुरुक्षेत्र विद्यापीठातून 1994 सालचे पदवीधर आहेत.
अवैध विदेशी बनावटीची शस्त्रे, 300 काडतुसे, 100 हून अधिक दारूच्या बाटल्या आणि 5 कोटी रुपये रोख, अनेक किलो सोन्याचे दागिने दिलबाग यांच्या घरुन जप्त केले.
INLD नेते आणि माजी आमदार दिलबाग सिंह यांच्या घरावर आणि परिसरावर ईडीने गुरुवारपासून छापे टाकण्यास सुरुवात केली आहे.
हरियाणातील माजी आमदार दिलबाग सिंग ज्याच्या घरातील काळा 'खजिना'चा नजारा पाहून ईडीचे अधिकारीही थक्क झाले आहेत.