Rajanand More
हाना-राविती माईपी-क्लार्क 21 वर्षांच्या असून मागील 170 वर्षांच्या न्यूझीलंड संसदेच्या इतिहासात सर्वात तरूण खासदार म्हणून त्यांची वर्णी लागली आहे.
ऑक्टोबर 2023 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मिळवला विजय. पाटी माओरी या पक्षाच्या त्या सदस्या आहेत.
त्यांचे पणजोबा न्यूझीलंडच्या कार्यकारी परिषदेचे माओरी समाजातील पहिले सदस्य होते. त्या ऑकलंडमधील हंटली या छोट्याशा गावातील आहेत.
दोन आठवड्यांपूर्वीच न्युझीलंड सरकारने घेतलेल्या निर्णयांना विरोध करताना क्लार्क यांचे नुकतेच संसदेत जोरदार भाषण. सोशल मीडियात होतेय व्हायरल.
आपण राजकारणी नसून माओरी भाषा आणि परंपरेच्या संरक्षक असल्याचे त्या सांगतात. त्यासाठीच संसदेत केलेल्या भाषणाने इतर सदस्य अवाक्.
भाषण संपल्यानंतर संसदेतील सर्व सदस्यांनी टाळ्यांचा कडकडाट करत भाषणाचे कौतूक केले. प्रेक्षक गॅलरीतील त्यांचे कुटुंबीय, मित्रही भाषणामुळे प्रभावित झाले.
इतक्या लहान वयात खासदार बनण्याची माझी कोणतीही योजना नव्हती. पण अशा काही गोष्टी घडल्या त्यामुळे मला माझे काम सोडून यावे लागले, असे क्लार्क भाषणादरम्यान म्हणाल्या.
वयाच्या 17 व्या वर्षी त्यांनी माओरी चंद्र कॅलेंजर-मरमतकाबद्दल 'माहिना' हे पुस्तक लिहिले.
संसदेत भाषणापूर्वी त्यांनी एका कार्यक्रमात माओरी समाजातील लोकांसमोर 'मी तुमच्यासाठी मरेन आणि तुमच्यासाठीच जगेन' असे विधान केले होते.