Ganesh Sonawane
'बिग बॉस मराठी 5' मधून महाराष्ट्रात लोकप्रिय झालेला 'छोटा पुढारी' अर्थात घनःश्याम दरोडे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
सोशल मीडियावर त्याच्या निधनाच्या अफवा पसरल्या होत्या. कुणीतरी बिग बॉस फेम घनश्याम यांचे ह्रदयविकाराने दु:खद निधन झालं आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. अशी पोस्ट सोशल मीडियावर केली होती.
घन:श्यामचा हार घातलेला एक फोटो व्हायरल झाला होता.
मला काहीही झालेलं नाही. मी ठिक आहे. धडधाकट आहे, बोलतोय चालतोय असा खुलासा आता घन:श्याम यांनी इन्स्टाग्रामवरुन पोस्ट करत केला आहे.
घनश्याम कोणत्याही पक्षाचा नेता नसला तरी तो समाजात घडणाऱ्या अनेक सामाजिक व राजकीय गोष्टींवर आपले मत परखडपणे मांडतो. त्यामुळे तो छोटा पुढारी म्हणून ओळखला जातो.
घन:श्यामच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास तो छोटा दिसत असला तरी आता तो 22 वर्षांचा आहे.
परंतु त्याची उंची 3 फूट 7 इंच असल्याने तो वयाने छोटा वाटतो.
हेच नाही तर छोटा पुढारी हा उच्च शिक्षित तरूण आहे. पदवीपर्यंतचे त्याचे शिक्षण झाले आहे.