Mangesh Mahale
पंतनगर पोलिसांनी हे फलक लावणाऱ्या भावेश भिंडे याच्यासह अन्य काही जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने हे होर्डिंग लावले होते
भावेश हा या कंपनीचा संचालक आहे. त्याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
या अनधिकृत होर्डिंगची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सर्वात मोठे होर्डिंग म्हणूनही नोंद आहे.
भावेश हा मुलुंड परिसरात राहतो. होर्डिग पडल्यानंतर त्याला पोलिस पकडण्यासाठी गेले असता तो फरार झाला.
त्याचे वडील रिक्षाचालक होते. भावेश एका जाहीरात कंपनीत आँफिस बॉयचे काम करीत होता.
त्याने होर्डींगचा स्वतंत्र व्यवसाय सुरु केला.मुंबई परिसरात त्याचा व्यवसाय झपाट्याने वाढला.
नववी नापास असलेल्या भावेशने २००९ मध्ये मुलुंडमधून अपक्ष म्हणून आमदारकी लढवली होती.
अनधिकृत होर्डिंगवरील जाहिराती दिसण्यासाठी पूर्व द्रुतगती मार्गावरील झाडांवर विषप्रयोग करण्यात आला होता.
NEXT: गंगा किनारी आरती, भैरव दर्शन अन् शक्तीप्रदर्शन..! पंतप्रधान मोदींनी दाखल केला उमेदवारी अर्ज