सरकारनामा ब्यूरो
यशार्थ हे मूळचे हमीरपूरमधील मौधा येथील आहेत, पण त्यांचे कुटुंब गाझियाबादमध्ये स्थायिक झाले आहे.
IAS यशार्थ शेखर यांनी तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली.
यशार्थ यांनी लखनऊ आणि दिल्लीमधून शिक्षण पूर्ण केले आहे.
लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार असल्यामुळे त्यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षेत अव्वल गुण मिळवले होते.
दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून त्यांनी अर्थशास्त्र विषयात बीए केले.
पदवीचे शिक्षण पूर्ण करताच त्यांनी IAS होण्यासाठी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली होती.
भूगोल विषय पर्यायी ठेवत त्यांनी यूपीएससीचा अभ्यास केला.
पहिल्या दोन प्रयत्नात अपयशी ठरल्यानंतरही त्यांनी मेहनत केली आणि तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससीत टॉप 15 मध्ये स्थान मिळवले.
2021 मध्ये यशार्थ 12 व्या रॅंकने परीक्षा उत्तीर्ण करत IAS अधिकारी झाले.