Danasari Seethakka : नक्षलवादी ते तेलंगणाच्या मंत्री; सीताक्का

सरकारनामा ब्यूरो

तेलंगणा मंत्री सीताक्का

तेलंगणा येथे झालेल्या विधानसभा निवडणुकीत यश मिळाल्यावर नव्या सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या ११ मंत्र्यांपैकी सीताक्का एक आहेत.

Seethakka | Sarkarnama

माओवादी आंदोलने

सीताक्का यांनी कमी वयातच माओवादी आंदोलनात सहभाग घेतला होता.

Seethakka | Sarkarnama

सशस्त्र गटाचे नेतृत्त्व

आदिवासी जन समुदायातील सीताक्का या सशस्त्र गटाचे नेतृत्त्व करत होत्या.

Seethakka | Sarkarnama

आंदोलनात भाऊ आणि पती गमावले

या आंदोलनावेळी त्यांनी आपला भाऊ आणि पती या दोघांनाही गमावलं.

Seethakka | Sarkarnama

दहा वर्षे माओवादी बंडखोर

सुरुवातीचे दहा वर्षे जंगलात राहून सीताक्का यांनी माओवादी बंडखोर म्हणून काम केले.

Seethakka | Sarkarnama

स्वतःहून आत्मसमर्पण

काही वर्षांनी त्यांनी बाहेर पडून माफी योजनेअंतर्गत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले, त्यानंतर त्यांच्या आयुष्याला नवे वळण मिळाले

Seethakka | Sarkarnama

कायद्याची पदवी मिळवत न्यायालयात प्रॅक्टिस

अभ्यास करुन त्यांनी कायद्याची पदवी मिळवली आणि वारंगल येथील न्यायालयात प्रॅक्टिसही केली.

Seethakka | Sarkarnama

राज्यशास्त्रात पीएचडी

कोविड-19 साथीच्या काळात त्यांच्या कार्याचे दूरदूरपर्यंत कौतुक झाले आणि त्यानंतर सीताक्कांनी उस्मानिया विद्यापीठातून राज्यशास्त्रात पीएचडी पूर्ण केली.

Seethakka | Sarkarnama

काँग्रेसमध्ये प्रवेश

2017 मध्ये सीताक्का यांनी तेलगू देसम पक्षातून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि 2018 ची विधानसभा निवडणूक जिंकली.

Seethakka | Sarkarnama

Next : लोकमान्यांचा लढवय्या बाणा अंगी असलेल्या मुक्ता टिळक; पाहा खास फोटो

येथे क्लिक करा