Giant killer in Lok Sabha Election 2024 : लोकसभेच्या निवडणुकीतील महाराष्ट्रातील जायंट किलर!

Vijaykumar Dudhale

भास्कर भगरे

केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांचा दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार भास्कर भगरे यांनी पराभव केला आहे. भगरे हे नाशिक जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत.

Bhaskar Bhagre

कल्याण काळे

मराठवाड्यातील मातब्बर नेते, जालन्यातून पाच वेळा निवडून आलेले केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे यांनी पराभूत केले आहे.

Kalyan Kale

बजरंग सोनवणे

भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव, माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे यांनी पराभव केला. मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका पंकजा मुंडे यांना बसला.

Bajrang Sonawane

सुरेश ऊर्फ बाळ्यामामा म्हात्रे

केंद्रीय पंचायत राज्य मंत्री कपिल पाटील यांना भिवंडी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सुरेश ऊर्फ बाळ्यामामा म्हेत्रे यांनी चितपट केले आहे.

Suresh Mhatre | Sarkarnama

ॲड. गोवाल पाडवी

नंदूरबारमधून दोन वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या डॉ. हिना गावीत यांचा पराभव काँग्रेसचे नवखे उमेदवार ॲड गोवाल पाडवी यांनी केला.

Adv Gowwal Padv

प्रतिभा धानोरकर

राज्याचे वन मंत्री, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूर मतदासंघातून पराभूत झाले आहेत. त्यांना काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी हरवले आहे.

Pratibha Dhanorkar

नीलेश लंके

महाराष्ट्राच्या राजकारणातील बडी हस्ती म्हणून ओळख असलेल्या विखे घराण्यातील डॉ. सुजय विखे पाटील यांचा सर्वसामान्य घरातून आलेले नीलेश लंके यांनी नगर दक्षिण मतदारसंघातून धोबीपछाड दिली आहे.

Nilesh Lanke

विशाल पाटील

सांगली मतदारसंघ शिवसेनेला सुटल्यानंतर अपक्ष निवडणूक लढविलेले विशाल पाटील यांनी दोन वेळा निवडून आलेले संजयकाका पाटील यांचा पराभव केला आहे.

Vishal Patil

गांधींचे विश्वासू, निष्ठावान, स्मृती इराणींना हरवणारे किशोरीलाल शर्मा कोण आहेत?

Kishori Lal Sharma