Rashmi Mane
लोकसभा निवडणुकीच स्मृती इराणी यांना हरवणारे किशोरीलाल शर्मा नक्की आहेत तरी कोण?
किशोरी लाल यांनी अमेठीमध्ये केंद्रीय मंत्री भाजप नेत्या स्मृती इराणी यांचा पराभव केला.
किशोरी लाल शर्मा हे मूळचे पंजाबमधील लुधियानाचे आहेत.
1983 मध्ये जेव्हा राजीव गांधींनी रायबरेली आणि अमेठीमध्ये पहिल्यांदा पाऊल ठेवले तेव्हा शर्माही त्यांच्यासोबत होते.
राजीव गांधींच्या मृत्यूनंतरही त्यांचे गांधी घराण्याशी संबंध चांगलेच राहिले.
सोनिया गांधींनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला तेव्हा किशोरी लाल शर्मा त्यांच्या जवळचे सहकारी बनले.
सोनिया गांधींनी राहुलसाठी अमेठीची जागा सोडली तेव्हा किशोर शर्मा यांना अमेठीची जबाबदारी देण्यात आली.