Vijaykumar Dudhale
भारत भालके यांचा जन्म 28 नोव्हेंबर 1960 रोजी पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे झाला. पंढरपूरमध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर कुस्तीचे धडे गिरवण्यासाठी ते कोल्हापूरला गेले. कोल्हापूरच्या प्रसिद्ध गंगावेश तालमीत त्यांनी कुस्तीतील डावपेच आत्मसात केले.
कोल्हापूरातून आल्यानंतर त्यांनी माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुक्यात जनसेवा संघटनेचे काम सुरू केले. भालके यांनी 1992 मध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून राजकीय कारकिर्दीस सुरुवात केली.
भारत भालके यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून राजकीय कारकिर्दीस सुरुवात केली. औदुंबरअण्णा पाटील यांचा विश्वास संपादन केल्यामुळे त्यांना कारखान्याचे उपाध्यक्षपद मिळाले.
वसंतराव काळे आणि औदुंबरअण्णा पाटील यांच्यात मतभेद झाल्यानंतर भालकेंनी काळे यांचे नेतृत्व मान्य करत कामाला सुरुवात केली. काळे यांच्या निधनानंतर भालके हे 2002 मध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष झाले. तेथूनच त्यांनी आमदार होण्याचे स्वप्न पाहिले.
भारत भालकेंनी 2004 मध्ये प्रथमच विठ्ठल परिवाराच्या झेंड्याखाली विधानसभेची निवडणूक लढवली. पण त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
पुढची 2009 ची विधानसभेची निवडणूक भारत भालके यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून (रिडालोस) पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून तत्कालीन उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात लढवली होती. त्या निवडणुकीत भालके हे मोहिते पाटील यांना हरवून जायंट किलर ठरले.
मोहिते पाटील यांचा पराभव करणाऱ्या भारत भालकेंना मुंबईला नेण्यासाठी तत्कालीन काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी खास हेलिकॉप्टर पाठवले होते. पुढे मोदी लाटेतही 2014 ची निवडणूक त्यांनी काँग्रेसच्या चिन्हावर लढवली आणि जिंकली.
भारत भालके यांनी 2019 ची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवली आणि आमदारकीची हॅट्ट्रीक केली. पण कोरोनाच्या काळात त्यांचे अकाली निधन झाले.
दुग्धाभिषेक ते हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी! साताऱ्यात दमयंतीराजेंची धूमधडाक्यात शिवजयंती