Ganesh Sonawane
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळाले आहे.
त्यात महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ल्याचा समावेश आहे.
या किल्ल्याला राजगड आणि रायगडनंतर स्वराज्याची तिसरी राजधानी म्हणून ओळखतात.
शिवाजी महाराजांनी १६७७ मध्ये दक्षिणेकडील मोहिमेदरम्यान नासीर मुहम्मद या किल्लेदाराकडून जिंजी किल्ला जिंकून घेतला.
जिंजी किल्ला हा अत्यंत मजबूत आणि अभेद्य होता. तो जिंकण्यासाठी थेट लष्करी हल्ला करणे खूप कठीण होते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी आपल्या बुद्धिमत्तेनं आणि रणनीतीने हा किल्ला ताब्यात घेतला असं इतिहासकार सांगतात.
महाराजांनी नासिर मुहम्मदला एक प्रस्ताव दिला. त्यानुसार, त्याला ५०,००० होन (सोन्याची नाणी) रोख रक्कम आणि वार्षिक १ लाख होन उत्पन्नाचा प्रदेश जहागीर म्हणून देण्याचे वचन दिले.
नासिर मुहम्मदला लढाई नको होती आणि त्याला हा प्रस्ताव फायदेशीर वाटला. त्यामुळे त्याने हा प्रस्ताव स्वीकारला आणि जिंजी किल्ल्याचा ताबा मराठ्यांना दिला.
छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यू नंतर मोघलांनी रायगडाला वेढा घातला. त्यावेळी छत्रपती राजाराम महाराज मोगल सैन्याला हुलकावणी देत १६८९ मध्ये जिंजीला पोहोचले. पुढचे ९ वर्ष याच किल्ल्याने त्यांना आश्रय दिला.
त्यानंतर चिडलेल्या मुघलांनी जिंजी किल्ल्याला वेढा घातला. ७ फेब्रुवारी १६९८ रोजी मुघलांनी हा किल्ला ताब्यात घेतला.