Jagdish Patil
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा 'अद्वितीय वैश्विक मूल्य' म्हणून युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे.
यामध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरीसह तामिळनाडूतील जिंजी या किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे.
पण युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत एखाद्या स्थळाची वा किल्ल्यांची निवड झाल्यास त्याचे फायदे काय असतात ते जाणून घेऊया.
विविध देशातील संस्कृतीची ओळख असलेल्या वास्तूंचे जतन, प्रसार, प्रचार करणं, तसंच या स्थळांच्या संरक्षण, संवर्धनासाठी मार्गदर्शन आणि आवश्यक असल्यास आर्थिक मदतीचं काम युनेस्को करते.
एखाद्या स्थळाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वामुळे युनेस्कोच्या यादीत समावेश केला जातो. यामध्ये इमारती, वास्तू, शहरे, वाळवंट, जंगले, बेट, तलाव, स्मारके असू शकतात.
एखाद्या स्थळाचे अस्तित्व टीकवणे, ते दुर्लक्षित होऊन नष्ट होऊ नये, यासाठी त्याचे संवर्धन आणि जतन करणे हा युनिस्कोच्या यादीत स्थळांचा समावेश करण्याचा मुख्य उद्देश असतो.
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात समाविष्ठ होण्याचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे ती ठिकाणं जगभरात प्रसिद्ध होतात.
साहजिकच त्यामुळे त्या ठिकाणांचे पर्यटन वाढतं, त्यामुळे नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतात.
देशासह परदेशातील पर्यटकांची संख्या वाढल्याने त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेला फायदा होतो.