Rajanand More
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी या सातत्याने चर्चेत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेलोनी यांना मेलोडी चॉकलेटचे पॅकेट भेट देतानाचा व्हिडीओ नुकताच सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला होता.
स्वित्झर्ल्डंमधील जी ७ परिषदेवेळी दोन्ही नेत्यांची पुन्हा भेट झाली होती. यावेळी सोशल मीडियात आपली जोडी फेमस असल्याचे मेलोनी मोदींना म्हणाल्या होत्या.
मेलोनी यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकामध्ये दिल्लीतील मार्च २०२३ च्या दौऱ्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यांचे स्वागताचे आणि आभाराचे फलक पाहून त्या भारावून गेल्या होत्या.
मेलोनी यांनी पुस्तकात या दौऱ्यातील आठवण सांगताना इटलीच्या परराष्ट्र मंत्र्यांनी त्यांना गंमतीमध्ये बोलताना दिल्लीतून निवडणूक लढविण्याबाबत सुचविले होते.
मेलोनी यांनी पुस्तकात लिहिले आहे आहे की, माझे सहकारी अन्टोनियो ताजानी म्हणाले होते, हे पोस्टर्स पाहून तुम्ही नवी दिल्ली मतदारसंघातून निवडणूक लढविली तर लाखो मते मिळतील.
पंतप्रधान मोदी आणि मेलोनी यांच्याकडून एकमेकांचा उल्लेख नेहमी 'गुड फ्रेंड' असा केला जातो. मेलोनी यांना भारताविषयी खास आकर्षणही आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेलोनी यांच्याविषयी काही दिवसांपूर्वी वादग्रस्त विधान केले होते. माझ्यासोबत फोटो काढण्यासाठी त्या भीक मागत होत्या, असे ट्रम्प म्हणाले होते.
मेलोनी यांना ट्रम्प यांना यावरून जोरदार प्रत्युत्तर दिले होते. इटली आणि मी कोणत्याही कारणासाठी कुणासमोरही भीक मागत नाही, अशा संतापलेल्या स्वरात त्यांनी पलटवार केला होता. अन्य युरोपियन देशांना ते असं बोलत नाही, असे डिवचलेही होते.