Rajanand More
कर्नाटक विधानपरिषदेच्या सात जागांसाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे पाच उमेदवार निवडून आले. या निवडणुकीत भाजपसह जेडीएसच्या सुमारे ११ आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याची चर्चा आहे.
फुटीर आमदारांमध्ये भाजपचे खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांचे नाव चर्चेत आहे. त्यावरून काँग्रेस नेत्या माजी आमदार अंजली निंबाळकर यांनी चार दिवसांपूर्वी (ता. २०) सोशल मीडियात पोस्ट करत गंभीर आरोप केले आहेत.
निकालाबद्दल आनंद व्यक्त करतानाच हलगेकर यांचे नाव वाचून आश्चर्य वाटल्याचे त्यांनी म्हटले आहे. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत ते काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात होते आणि आपल्या पराभवाचे तेच मुख्य कारण होते, असा त्याचा अर्थ असल्याचे त्यांनी लिहिले आहे.
निंबाळकर पुढे म्हणतात, त्यावेळीही त्यांनी संगनमताने काम केले होते? मोठा कट समोर येत आहे, असा गंभीर दावाही त्यांनी केला आहे.
नेत्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी मला बळीचा बकरा बनविण्यात आले का?, असा सवाल करत निंबाळकर यांनी थेट पक्षातील नेत्यांवर निशाणा साधला आहे.
निंबाळकर निवडून आल्या असत्या तर मंत्रिपद मिळाले असते, अशी चर्चा त्यावेळी रंगली होती. पक्षातील काही नेत्यांनीच त्यांच्या विरोधात मोहिम उघडली होती, अशीही चर्चा होती.
अंजली निंबाळकर या काँग्रेसच्या उच्चशिक्षित नेत्या असून २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत खानापूर मतदारसंघातून त्या विजयी झाल्या होत्या. मात्र, २०२३ च्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता.
२०१८ च्या खानापूरमधील त्यांच्या विजयाने काँग्रेसने इतिहास घडविला होता. या मतदारसंघात निंबाळकर यांनी पक्षाला पहिल्यांदाच विजय मिळवून दिला होता. IPS हेमंत निंबाळकर हे त्यांचे पती आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.