Rashmi Mane
इटलीच्या पंतप्रधान जिओर्जिया मेलोनी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून, त्यांनी व्हाइट हाऊसमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली.
या भेटीत ट्रम्प यांनी मेलोनींचं मनापासून कौतुक केलं आणि त्यांना 'महान नेता' म्हणून संबोधलं.
जिओर्जिया मेलोनी या शुल्क लागू झाल्यानंतर अमेरिकेला भेट देणाऱ्या पहिल्या युरोपीय नेत्या आहेत.
या भेटी दरम्यान त्यांनी ट्रम्प यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली, ज्यात व्यापार, संरक्षण आणि जागतिक स्थैर्य यांचा समावेश होता.
या भेटीमुळे अमेरिका-इटली संबंध अधिक मजबूत होतील, असा विश्वास व्यक्त केला जातोय.
मेलोनी आणि ट्रम्प यांची ही भेट युरोप-अमेरिका संबंधांच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरू शकते!