Ganesh Sonawane
भारत आणि पाकिस्तान यांच्यात सैन्य कारवाई आणि युद्धजन्य परिस्थिती असताना तुर्की या देशाने पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा दर्शवल्याने भारतात संतापाची लाट उसळली आहे. देशभरात 'बॅन तुर्की" चळवळ उभी राहत आहे.
भारत आणि तुर्की या दोन्ही देशांची तुलना करायची झाल्यास भारतापुढे तुर्की देशाचं अस्तित्व चिमुटभर आहे असं म्हणावं लागेल. लष्करी ताकदीत तुर्की भारताच्या बऱ्याच मागे आहे.
लष्करी ताकदीचा विचार केल्यास जागतिक क्रमवारीत भारत चौथ्या स्थानी आहे. तर तुर्की अकरा ते तेराव्या नंबरच्या दरम्यान आहे.
भारताकडे 14 लाख सक्रीय सैनिक आहे. तुर्की कडे फक्त 4.5 लाख
भारताचे लष्करी बजेट $76 अब्ज इतके तर तुर्कीचे केवळ $25-30 अब्ज इतके आहे.
भारताकडे 160 पेक्षा अधिक अण्वस्त्र आहेत. तुर्कीकडे अण्वस्त्र नाही.
भारताकडे SWiFT, Heron हे ड्रोन आहेत. तुर्की कडे Bayraktar TB2, Akinci
भारत – DRDO, HAL ; तुर्की – Baykar, ASELSAN