Ganesh Sonawane
गुणरत्न सदावर्ते हे मुंबई उच्च न्यायालयातील वकील असून त्यांची कन्याही आता वकिलीच्या क्षेत्रात पाऊल ठेवत आहे.
सदावर्ते यांची कन्या झेन'ला ईस्ट लंडन युनिव्हर्सिटी येथे आंतरराष्ट्रीय कायद्यातील एलएलबी पदवीसाठी प्रवेश मिळाला आहे.
झेनचा पुढील प्रवास हा बॅरिस्टर होण्याकडे असून ती आता थेट लंडनला कायद्याचे धडे घेणार आहे.
काही दिवसांपूर्वीच सदावर्ते कुटुंबीयांकडून तिच्या या यशाबद्दल तिला शुभेच्छा देण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते.
मंत्री छगन भुजबळ हे देखील झेनला शुभेच्छा देण्यासाठी कार्यक्रमाला गेले होते. विधी क्षेत्रात उज्वल भविष्य घडविण्यासाठी भुजबळ यांनी तिला शुभेच्छा दिल्या.
झेनचे शालेय शिक्षण मुंबईतील डॉन बॉस्को इंटरनॅशनल शाळेत झाले.
झेनने बॅरिस्टर पदवीच्या शिक्षणासाठी आता लंडन गाठले आहे. विशेष म्हणजे तीने स्वतःच्या गुणवत्तेवर राष्ट्रीय गुणवंतांच्या आधारे आंतरराष्ट्रीय विद्यापीठात प्रवेश मिळवला आहे.
२०१८ मध्ये मुंबईतील क्रिस्टल टॉवर आगीत झेनने १७ जणांचे प्राण वाचवले होते. तीचा शौर्य पुरस्काराने गौरव करण्यात आला होता.