Sunil Balasaheb Dhumal
प्रभू श्रीराम जन्मभूमीसाठी सुरू असलेल्या तब्बल ५०० वर्षाच्या संघर्षाला यश आले. मंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या यशाबाबत भाजप नेते सुनील देवधर यांच्या नेतृत्वात 'नमो पुणे अभिवादन' करण्यात आले.
यासाठी पुण्यातून भगवे झेंडे घेऊन बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
सुनील देवधार हे भाजपकडून पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.
भाजप कार्यालय, कृष्णसुंदर गार्डन, डीपी रोड, एरंडवणे येथून या रॅलीला सुरुवात झाली.
भाजपचे युवा नेते कुणाल टिळक, राजे शिवराय प्रतिष्ठानचे अध्यक्ष व भाजप शहर चिटणीस महेश पवळे आणि दिनेश होले रॅलीला उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अभिनंदनपर काढलेल्या या रॅलीत मात्र पुण्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांनी पाठ फिरवली होती.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे भाजपमध्ये अंतर्गत गटबाजीला ऊत आल्याचेच स्पष्ट होत आहे.