Mangesh Mahale
या पुस्तकात दाऊद सुजाता नावाच्या मुलीच्या प्रेमात होता, असा उल्लेख आहे. सुजाता याही दाऊदवर प्रेम करीत होत्या. त्या शीख समाजाच्या होत्या.
दाऊदचा धर्म वेगळा होता अन् तो गुंड असल्याने सुजाता यांच्या घरच्यांचा या नात्याला विरोध होता. सुजाताचे लग्न दुसऱ्याशी ठरले होते.
दाऊदला सुजाता यांच्या लग्नाची गोष्ट समजल्यानंतर त्याने त्यांच्या घरासमोर गोंधळ घातला होता.
त्याच्याकडे रामपुरी चाकू असल्याचा दावा पुस्तकात करण्यात आला आहे. या लग्नास सुजाताच्या वडिलांनी नकार दिला.
तू जर सुजाताशी लग्न करशील तर आम्ही (सुजाताचे आई-वडील) आत्महत्या करू, असे तिच्या वडिलांनी त्याला सांगितले.
तेव्हा सुजाता आली तिनं सांगितले, की मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. तेव्हा दाऊद भावनाविवश होऊन परतला. ('डोंगरी टू दुबई तक' या पुस्तकातील दाव्यावर ही माहिती आहे, 'सरकारनामा' त्याची पुष्टी करीत नाही.)