Pune Gangsters Murder : मोहोळ, आंदेकर, माळवदकर, लोंढे... टोळीयुद्धात खून झालेले गँगस्टर्स; पाहा यादी!

Chetan Zadpe

शरद मोहोळ -

कोथरुडमधील सुतारदरा भागात कुख्यात गुंड शरद मोहोळ याला ठार करण्यात आलं. चार व्यक्तींनी त्याच्यावर भरदिवसा गोळ्या झाडल्याने एकच खळबळ उडाली. 

Pune Gangsters Murder : | Sarkarnama

बाळू आंदेकर -

बाळू आंदेकर याचा 17 जुलै 1984 रोजी सिव्हिल कोर्ट आवारात खून करण्यात आला होता. माळवदकर गँगने हा खून केला. इथूनच पुण्यात गँगवार भडकून खुनांचे सत्र सुरू झाले.

Pune Gangsters Murder : | Sarkarnama

प्रमोद माळवदकर -

प्रमोद माळवदकर हा 1997 मध्ये पोलिस एन्काउंटरमध्ये काळेवाडी भागात मारला गेला. माळवदकर आणि आंदेकर टोळीयुद्ध या दरम्यान सुरू झाले होते.

Pune Gangsters Murder : | Sarkarnama

मामा माळवदकर -

प्रमोद माळवदकरच्या मृत्यूनंतर मामा माळवदकर गँग चालवत होता. मात्र 26 फेब्रु 2004 रोजी धारदार शस्त्राने पुण्यातील सोमवार पेठेत त्याचा खून करण्यात आला.

Pune Gangsters Murder : | Sarkarnama

आप्पा उर्फ प्रकाश लोंढे -

कुख्यात गुंड आणि वाळू माफिया अशी प्रकाश लोंढेची ओळख होती. 28 मे 2015 ला उरळीकांचन येथील शिंदवणे रस्त्यावर धारदार शस्त्राने त्याचा खून करण्यात आला.

Pune Gangsters Murder : | Sarkarnama

संदीप मोहोळ -

गँगस्टर संदीप मोहोळ याचा 4 ऑक्टोबर 2006 रोजी पौड फाटा येथे गोळ्या झाडून खून करण्यात आला.

Pune Gangsters Murder : | Sarkarnama

NEXT : तुरुंगात असतानाही 'हा' नेता होणार खासदार..

क्लिक करा...