पत्नीने मानसिक छळ अन् अघोरी पूजेचे आरोप केलेले ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक 'गितेश राऊत' कोण?

Jagdish Patil

विनायक राऊत

ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनेने त्यांच्याविरोधात गंभीर आरोप केले आहेत.

Vinayak Raut | Sarkarnama

गुन्हा

विनायक राऊत, त्यांचा मुलगा गितेशसह सात जणांविरोधात सुनेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Gitesh Vinayak Raut | Sarkarnama

सून

राऊत यांची सून गिरीजा हीने आपले पती गितेश हे तिच्याशी वैवाहिक संबंध ठेवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप केला आहे.

Gitesh Vinayak Raut | Sarkarnama

गितेश राऊत

याच आरोपांमुळे चर्चेत आलेल्या गितेश विनायक राऊत यांच्या बद्दलची माहिती जाणून घेऊया.

Gitesh Vinayak Raut | Sarkarnama

नगरसेवक

गितेश राऊत हे माजी खासदार विनायक राऊत यांचे सुपूत्र असून सध्या ते ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रभाग क्र. ८९ चे नगरसेवक आहेत.

Gitesh Vinayak Raut | Sarkarnama

प्रभाव

गितेश यांचे पालनपोषण मुंबईत झालं असून, त्यांच्यावर वडिलांच्या राजकीय कारकीर्दीचा प्रभाव असल्याचं दिसून येतं.

Gitesh Vinayak Raut | Sarkarnama

भूमिका

त्यांनी शिवसेनेच्या स्थानिक राजकारणात काही काळासाठी सक्रीय भूमिका बजावली होती.

Gitesh Vinayak Raut | Sarkarnama

छळ

तर गितेश यांच्यासह त्यांच्या घरच्यांनी आपला ७ वर्ष छळ करून माझा आणि माझ्या परिवाराचा घात केल्याचा आरोप गिरीजा यांनी केला आहे.

Gitesh Vinayak Raut

संबंध

त्या म्हणाल्या, 'डिसेंबर २०१७ ला लग्न झाल्यापासून सप्टेंबर २०१८ पर्यंत आमच्यात काहीही शारीरिक संबंध आले नव्हते.'

Gitesh Vinayak Raut | Sarkarnama

अघोरी कृत्य

'अघोरी कृत्य करताना माझ्या अंगावरून जिवंत कोंबडा उतरवणं, माझे अंगावरचे न धुतलेले वापरलेले कपडे वापरून उतारे करण्याचे प्रकार केले.'

Gitesh Vinayak Raut

लपवण्यासाठी

तर हे सर्व फक्त त्यांचा मुलगा शारीरिक संबंध करण्यासाठी असक्षम आहे हे लपवण्यासाठी त्यांनी केल्याचा आरोपही त्यांनी केला.

Gitesh Vinayak Raut | Sarkarnama

आरोप फेटाळले

मात्र, सुनेचे आरोप विनायक राऊतांनी फेटाळून लावले आहेत. गेल्या ३ वर्षांपासून गितेश आणि गिरीजा एकत्र राहत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Gitesh Vinayak Raut | Sarkarnama

NEXT : तिकीट न दिल्याने समर्थकांचा राडा; भाजपचं टेन्शन वाढवणारे नरोत्तम मिश्रा कोण?

Narottam Mishra | Datia Bypoll | Sarkarnama
क्लिक करा