Jagdish Patil
मध्य प्रदेशातील दतिया विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत माजी आमदार नरोत्तम मिश्रा यांना भाजपने उमेदवारी नाकारली आहे.
मिश्रा यांना उमेदवारी न दिल्याने त्यांच्या समर्थकांनी तीव्र संताप व्यक्त करत आंदोलन सुरू केलं आहे.
संतप्त झालेल्या समर्थकांनी रस्त्यावर उतरून ग्वाल्हेर-झाशी राष्ट्रीय महामार्ग रोखल. तर काही ठिकाणी वाहनांची तोडफोड केली.
याच पार्श्वभूमीवर नरोत्तम मिश्रा यांची राजकीय कारकिर्द नेमकी कशी आहे ते जाणून घेऊया.
मिश्रा यांचा जन्म १५ एप्रिल १९६० रोजी ग्वाल्हेर येथे झाला. त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चामधून आपली राजकीय वाटचाल सुरू केली.
१९९८ मध्ये त्यांनी जीवाजी विद्यापीठातून PHD केली. यापूर्वी ते ग्वाल्हेर स्टुडंट युनियनचे सचिव म्हणूनही कार्यरत होते.
१९९० मध्ये त्यांना भाजपने डबरा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. या निवडणुकीत विजय मिळवत त्यांनी पहिल्यांदा विधानसभेत प्रवेश केला.
१९९८ आणि २००३ मध्येही त्यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला. तर २००८ पासून दतिया मतदारसंघातून ते सलग ३ वेळा आमदार म्हणून निवडून आले.
मात्र, २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र भारती यांनी मिश्रा यांचा पराभव केला.
यंदाच्या पोटनिवडणुकीत भाजप पुन्हा नरोत्तम मिश्रा यांनाच उमेदवारी देईल, अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होती.
मात्र पक्षाने त्यांच्याऐवजी आशुतोष तिवारी यांना उमेदवारी दिल्याने मिश्रा यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.