Rajanand More
इंडिया आघाडीची ८ जूनला दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत २५ पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संवाद साधला. त्यांच्या या भाषणातील ठळक दहा मुद्दे पाहूयात. त्यांचे भाषण मित्रपक्षांसाठी बुस्टर डोस असल्याचे मानले जात आहे.
केवळ निवडणुका जिंकण्याची रणनीती पुरेशी नाही. सरकार, भाजपविरोधात देशव्यापी आंदोलनाची गरज असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.
काँग्रेस किंवा माझ्यावर टीका झाली तरी ती शांतपणे स्वीकारण्याची तयारी असल्याचे सांगत त्यांनी मित्रपक्षांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.
भगवान शंकराच्या ‘नीलकंठ’ रूपाचा उल्लेख करून काँग्रेस सर्वांना सोबत घेऊन चालत असल्याचा संदेश राहुल गांधी यांनी दिला.
सपा, टीएमसी, आरजेडी या पक्षांचे कान उपटताना राहुल म्हणाले, हे पक्ष अजूनही जुन्या राजकीय पद्धतीने विचार करत आहे. केवळ निवडणूक प्रक्रियेवर विसंबून राहून चालणार नाही.
ममता बॅनर्जी यांना निवडणूक चोरी झाल्याचे ९० टक्के वाटत असेल. उद्धव ठाकरे आणि तेजस्वी यादव यांना ४० टक्के चोरी झाल्याचे वाटत असेल. पण देशात १०० टक्के निवडणूक चोरी होत असल्याचा गंभीर आरोपही राहुल यांनी केला.
माझे सोशल मीडियात लाखो फॉलोअर्स आहेत. पण सोशल मीडिया, डिजिटल प्लॅटफॉर्म, मीडियातील काही लोकही सरकारच्या बाजूने काम करत असल्याचे राहुल गांधी म्हणाले.
काँग्रेस पक्ष हा आंदोलनातून निर्माण झालेला ऐतिहासिक पक्ष असून भाजप-आरएसएससमोर कधीच झुकणार नाही, असे राहुल यांनी स्पष्ट केले.
आपण २०२४ ची निवडणूक जिंकली आहे. पुढची निवडणूकही आपण जिंकली आहे. लोकांच्या मनात भाजपविरोधात रोष आहे, असा दावाही राहुल यांनी केला.
नितीश कुमार सोडून गेले, याला मी किंवा काँग्रेस पक्ष जबाबदार नसल्याचे राहुल यांनी सर्वांसमोर स्पष्ट केले. देशाच्या मुद्यावर डीएमकेही सोबत असल्याचे संकेत त्यांनी दिले.
INDIA आघाडीतील निराशा दूर करून सर्वांनी एकजूट ठेवली तर भाजप राज्यागणिक कमकुवत होई, असा विश्वास राहुल यांनी व्यक्त केला.