Pradeep Pendhare
जगभरात इलेक्ट्रॉनिक कचऱ्याचे (ई-कचरा) प्रमाण झपाट्याने वाढत असून 2022 मध्ये सुमारे 62 दशलक्ष टन ई-कचरा निर्माण झाला.
या एकूण ई-कचऱ्यापैकी 22.3 टक्के ई-कचऱ्याचे अधिकृतरीत्या संकलन व पुनर्वापर करण्यात आल्याचं आंतरराष्ट्रीय अंदाज आहे.
संगणक, सर्व्हर, हार्डडिस्क, मोबाइल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये असलेले सोने, चांदी, तांबे आणि दुर्मिळ धातू हे अधिकृत पुनर्वापराअभावी वाया जात आहेत.
तंत्रज्ञानात वेगाने होणारा बदल आणि डिजिटल बदलामुळे ई-कचऱ्याचे प्रमाण वाढत असून अधिकृत पुनर्वापर आणि निर्माण होणारा कचरा यामधील तफावत वाढत आहे.
भारतामध्येही पर्यावरणपूरक, नियमांनुसार आणि सुरक्षित ई-कचरा व्यवस्थापन सेवांची मागणी वाढत आहे
दिल्ली, नोएडा, मुंबई, पुणे, बेंगळूर, चेन्नई आणि हैदराबादसह प्रमुख शहरांत जुनी आयटी उपकरणे सुरक्षितरीत्या विल्हेवाट लावण्यासाठी अधिकृत संस्थांचा पर्याय स्वीकारत आहेत.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ई-कचऱ्याचा पुनर्वापराबाबत कंपनीना सूचना असून, अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी प्रोत्साहन देत.
जागतिक स्तरावर ई-कचऱ्याचे प्रमाण सातत्याने वाढत असताना अधिकाधिक संस्था अधिकृत पुनर्वापर व्यवस्थेत सहभागी होणे ही काळाची गरज व्यक्त होत आहे.
लाखो इलेक्ट्रॉनिक उपकरणांची विल्हेवाट लावताना पर्यावरण संरक्षणाबरोबरच डेटा सुरक्षा आणि नैसर्गिक संसाधनांच्या संवर्धन आवश्यक असल्याचे एस अँड डी रीसायकलर कंपनीचे सीईओ रोहन श्रीवास्तव यांनी म्हटले.