Pradeep Pendhare
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे अपडेट दिले आहेत.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण अन् एग्रीस्टॅक पोर्टलवरील नोंदणीची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करण्याचे सरकारने निर्देश दिलेत.
1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीमधील पीक कर्जांपैकी 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेली आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेली कर्जांचा विचार होणार
पात्र शेतकऱ्यांना कमाल दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे.
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 चा लाभार्थी पात्र शेतकऱ्यांना कमाल 50 हजार रुपयांपर्यंत कर्जमुक्ती मिळणार
शेतकऱ्यांची थकबाकी निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आहे, त्यांना एकवेळ तडजोड योजनेअंतर्गत अतिरिक्त रक्कम स्वतः भरल्यानंतर शासनाच्या योजनेचा लाभ घेता येणार
सन 2022-23, 2023-24 व 2024-25 या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन वर्षांत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळणारFarm Loan Waiver 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांनी योजनेचा लाभासाठी आधार क्रमांक, बँक खाते, मोबाईल क्रमांक आणि जमिनीच्या नोंदी अद्ययावत करून मृत कर्जदार खातेदारांच्या वारसांची नोंद करणे आवश्यक आहे.