Pradeep Pendhare
भारताविरुद्ध नेहमीच कुरापत करणाऱ्या पाकिस्तानबरोबर युद्धजन्यस्थितीनंतर दोन्ही देशाबरोबर जगातील अण्वस्त्र चर्चेत आली.
रशिया, अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, चीन, भारत, पाकिस्तान, उत्तर कोरिया आणि इस्त्राईल, जगातील ही नऊ अण्वस्त्रधारी देश आहे.
जगात अंदाजे 12 हजार 241 एवढा अण्वस्त्र साठा असल्याचे सांगितले जाते.
यात लष्करी वापरासाठी अंदाज 9 हजार 614 एवढा अण्वस्त्र साठा तयार असल्याची माहिती मिळते.
जगभरातील नऊही अण्वस्त्र देशांनी 2024मध्ये आपल्या अण्वस्त्रसाठ्यांचे आधुनिकीकरण केल्याचा दावा 'एसआयपीआरआय' आंतरराष्ट्रीय गटाने केला आहे.
भारत अण्वस्त्र सज्ज असून, अलीकडच्या काळात साठ्यात किंचित वाढ करताना आधुनिकीकरण केलं आहे.
काॅनिस्टराइज्ड प्रकारातील क्षेपणास्त्र संयुक्त युद्धसामग्रीसह अण्वस्त्र वाहणारी अन् साठवून ठेवण्याचं तंत्रज्ञान भारतानं विकसित केल्याचा दावा 'एसआयपीआरआय' गटाने केला आहे.
पाकिस्तान येत्या दशकभरात अण्वस्त्रसाठा वाढवण्यावर भर देणार असल्याचं 'एसआयपीआरआय' गटाने सूचित केलं आहे.