Rupee fall under Modi : मोदींच्या 12 वर्षांत रुपया 62% घसरला? मनमोहन सिंग अन् मोदी सरकारच्या काळातील डॉलरसमोर रुपयाची स्थिती

Pradeep Pendhare

मोदी PM झाले तेव्हा...

नरेंद्र मोदी जेव्हा 26 मे 2014 मध्ये पहिल्यांदा भारताचे पंतप्रधान झाले तेव्हा अमेरिकेचा 1 डॉलर भारताच्या 58.94 रुपयांच्या बरोबरीला होता.

Rupee fall under Modi | Sarkarnama

रुपयाची मोठी घसरण

मोदी दुसऱ्यांदा निवडणूक जिंकले, तेव्हा रुपयात 17 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आणि 30 मे 2019 रोजी रुपया एका डॉलरच्या तुलनेत 69.37 वर पोहोचला.

Rupee fall under Modi | Sarkarnama

मोदींचा तिसरा कार्यकाळ

नरेंद्र मोदी जून 2024 मध्ये तिसरा कार्यकाळ सुरू केल्यावर रुपया 83.38 च्या पातळीवर पोहोचला. म्हणजेच 2019 ते 2024 दरम्यान रुपयात 20 टक्क्यांहून अधिक घसरण नोंदवली गेली.

Rupee fall under Modi | Sarkarnama

डाॅलरसमोर रुपया 96वर

नरेंद्र मोदी यांच्या एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाची 2 वर्षे पूर्ण झाली होत असताना, रुपया एका डॉलरच्या तुलनेत सुमारे 96 रुपयांवर पोहोचला आहे. या 2 वर्षांत 14.75 टक्क्यांची घसरण झाली आहे.

Rupee fall under Modi | Sarkarnama

मोदींच्या 12 वर्षांच्या काळात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 12 वर्षांच्या कार्यकाळात रुपयात 62.33 टक्क्यांची घसरण झाली आहे. रुपयाचे मूल्य कमी होण्याची ही मालिका प्रत्येक सरकारच्या काळात पाहायला मिळाली आहे.

Rupee fall under Modi | Sarkarnama

सिंग PM झाले तेव्हा...

मे 2004 मध्ये मनमोहन सिंग यांनी पंतप्रधानपद सांभाळले, तेव्हा एक डॉलर खरेदी करण्यासाठी 45.31 रुपये द्यावे लागायचे.

Rupee fall under Modi | Sarkarnama

सिंग यांच्या पायउतारावेळी

मनमोहन सिंग जेव्हा पदावरून पायउतार झाले, तोपर्यंत रुपया घसरून 60 च्या आसपास पोहोचला होता.

Rupee fall under Modi | Sarkarnama

सिंग यांच्या कार्यकाळात

मनमोहन सिंग यांच्या 10 वर्षांच्या (2004-2014) कार्यकाळात रुपयाचे मूल्य 31.65 टक्क्यांनी कमी झाले होते.

Rupee fall under Modi | Sarkarnama

NEXT : मोदी सरकारकडून गिग वर्कर्ससाठी मोठी योजना

येथे क्लिक करा :