Ganesh Sonawane
भारतावर जवळपास 200 वर्षे इंग्रजांनी राज्य केलं. पण एक राज्य असं होतं, जे इंग्रजांच्या ताब्यात कधीच आलं नाही.
इंग्रज 1608 साली व्यापाराच्या निमित्ताने भारतात आले. 1615 मध्ये त्यांना भारतात व्यवसायाची मोकळीक मिळाली.
हळूहळू त्यांनी अनेक राज्यांवर ताबा मिळवला. भारतीयांना इंग्रजांची गुलामी भोगावी लागली.
पण एक राज्य असं होतं जिथे इंग्रज कधीच पोहचू शकले नाहीत. कारण या राज्यावर आधीच पोर्तुगीजांचा कब्जा होता.
या राज्यात वास्को द गामा 1498 साली पोहोचला होता. इंग्रजांच्या आधीच पोर्तुगीजांनी इथे आपलं बस्तान बसवलं होतं.
इंग्रज आणि पोर्तुगीज यांच्यात अनेक संघर्ष झाले. तरीही हे राज्य ब्रिटिशांच्या ताब्यात कधीच गेलं नाही.
हे राज्य म्हणजे गोवा ! इंग्रज कधीही गोव्यावर सत्ता गाजवू शकले नाही.
गोव्यावर ब्रिटिशांचे राज्य नव्हते म्हणून गोव्याला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळालं नाही. तर 1961 मध्ये स्वांतत्र्य मिळालं.
30 मे 1987 रोजी गोवा स्वतंत्र राज्य बनलं. भारताचं 25 वं राज्य म्हणून गोव्याची नोंद झाली.