Tourism New Rules: पर्यटकांनो, तर तुमच्यावर होऊ शकतो गुन्हा दाखल!; सरकारने आणले नवे नियम

Deepak Kulkarni

पर्यटकांची पसंती

गोवा हे नेहमीच पर्यटकांच्या पसंतीचे पहिले राज्य राहिले आहेत.

Goa tourist ban | Sarkarnama

जगभरात ओळख

त्यामुळे हे निळ्या-शितल समुद्रकिनारे, एन्जॉयफुल नाईट लाईफ, भ्रमंती, खाणंपिणं तसेच पोर्तुगीज संस्कृतीसाठी जगभरात ओळखला जातो.

Goa tourist ban | Sarkarnama

पर्यटकांची मोठी गर्दी

गोवा हे राज्य जवळून पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी कायम दिसून येते. तिथे स्कूटी, बाईक किंवा कार रेंटवर उपलब्ध होतो. तसेच स्थानिक राज्य बस आणि लोकल फेरी या कमी खर्चाच्या प्रवासाचे पर्याय उपलब्ध आहेत.

Goa tourist ban | Sarkarnama

सर्वोत्तम काळ

गोव्यात खरंतर ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा पर्यटकांसाठी कालावधी भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ समजला जातो.पण आता सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यातही गोव्यात पर्यटकांची झुंबड उडताना दिसून येत आहे.

Goa tourist ban | Sarkarnama

कठोर पावले

गोव्यात सध्या पावसाचा चांगलाचत वाढला आहे.यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून होणारे अपघात आणि मृत्यू रोखण्यासाठी हे कठोर पावले टाकण्यात आले आहे.

Goa tourist ban | Sarkarnama

महत्त्वपूर्ण आदेश

आताच हाती आलेल्या माहितीनुसार, गोव्यातील उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी संयुक्तपणे हा महत्त्वपूर्ण आदेश काढण्यात आला आहे.

Goa tourist ban | Sarkarnama

कायदेशीर बंदी

जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशानुसार, सर्व प्रमुख धबधबे, नद्या, तलाव आणि इतर नैसर्गिक पाण्याच्या ठिकाणी,पोहणे, आंघोळ करणे, पाण्यात उतरणे आणि सेल्फी यांसारख्या सर्व धोकादायक कृत्यांवर पूर्णपणे कायदेशीर बंदी घालण्यात आली आहे.

Goa tourist ban | Sarkarnama

60 दिवसांकरिता बंदी

गोव्यातील धबधबे आणि नद्यांच्या परिसरात पर्यटकांना फिरण्याची मुभा असणार आहेत. मात्र, जर पाण्याचा प्रवाह किंवा नदीपात्रात उतरण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. ही बंदी पुढील 60 दिवसांकरिता लागू असणार आहेत.

Goa tourist ban | Sarkarnama

6 पर्यटकांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

गेल्या काही दिवसांपासून गोव्यात एकाच महिन्याभरात धबधबे, नद्या आणि समुद्रस्थळी क्षेत्रांमध्ये तब्बल 6 पर्यटकांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता प्रशासनानं कठोर पावले उचलली आहेत.

Goa tourist ban | Sarkarnama

NEXT: SC-ST आरक्षण उपवर्गीकरण म्हणजे काय? याची गरज, वाद जाणून घ्या

SC-ST | Sarkarnama
येथे क्लिक करा...