Gobardhan : शेणापासून करा गॅसनिर्मिती अन् कमवा बक्कळ पैसा; मोदी सरकारने आणली 'गोबरधन' योजना

Rajanand More

गोबरधन

केंद्र सरकारने गोबरधन या महत्वाकांक्षी योजनेला गुरूवारी (ता. ६) मंजुरी दिली आहे. याअंतर्गत शेतीतील पराली, शेण तसेच शहरांतील जैविक कचऱ्यापासून कॉप्रेस्ड बायोगॅस (CBG) निर्मिती करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

Gobardhan | Sarkarnama

१० वर्षांचे टार्गेट

या योजनेची अंमलबजावणी 2026-27 ते 2035-36 या आर्थिक वर्षांपर्यंत केली जाईल. 'गोबरधन'ला (GOBARdhan) एकूण 23,731 कोटी रुपयांच्या तरतुदीसह मंजुरी देण्यात आली आहे.

Gobardhan | Sarkarnama

सरकारकडून खरेदीची हमी

योजनेतील सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे सरकारी खरेदीची हमी. सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन (CGD) कंपन्यांना CBG खरेदी करणे बंधनकारक केले जाणार आहे.

Gobardhan | Sarkarnama

अशी होणार कमाई

CBG साठी सरकारने प्रति MMBTU 2,110 रुपये असा दर जाहीर केला आहे. हा दर किमान 10 वर्षांसाठी लागू असेल. त्यामुळे बायोगॅस तयार करणाऱ्यांना उत्पन्नाचीही हमी असणार आहे.

Gobardhan | Sarkarnama

आर्थिक सहाय्य

नवीन CBG प्रकल्प उभारण्यासाठी किंवा सध्याच्या प्रकल्पाचा विस्तार करण्यासाठी सरकार प्रति टन प्रतिदिन क्षमतेनुसार 2 कोटी रुपयांपर्यंत भांडवल उपलब्ध करून दिले जाणार आहे.

Gobardhan | Sarkarnama

जोखीम हमी

केवळ यंत्रसामग्रीसाठीच नव्हे, तर कचरा संकलन आणि सेंद्रिय खत निर्मितीच्या सुविधांसाठीही आर्थिक सहाय्य केले जाणार आहे. तसेच बँकांकडून कर्ज मिळावे यासाठी सरकार जोखीम हमी देणार आहे.

Gobardhan | Sarkarnama

खतविक्रीतूनही उत्पन्न

CBG निर्मितीतून बाहेर पडणारा कचरा हा सेंद्रिय खत म्हणून वापरता येणार आहे. त्यामुळे गॅस विक्रीसोबतच खत विक्रीतूनही अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते.

Gobardhan | Sarkarnama

शेतकऱ्यांना संधी

गोबरधन योजना ही केवळ शेतकरीच नव्हे तर ग्रामीण उद्योजक आणि सहकारी संस्थांसाठी दुहेरी उत्पन्नाचा मार्ग असेल, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.

Gobardhan | Sarkarnama

NEXT : लाखो फॉलोअर्स, पण एक चूक भोवली अन् द्यावा लागला सरकारी नोकरीचा राजीनामा!

येथे क्लिक करा.