Godavari River : गोदावरी नदी हिरव्या संकटात, 'जलपर्णीचा विळखा' नक्की काय आहे ही वनस्पती?

Ganesh Sonawane

जलपर्णी ही एक जलचर वनस्पती आहे, जी पाण्यात सहजपणे तरंगते. याला 'ईखोरनिया क्रॅसिप्स' असे शास्त्रीय नाव आहे.

Water Hyacinth Godavari River | Sarkarnama

जलपर्णीला इंग्रजीमध्ये वॉटर हायसिंथ म्हणतात. या वनस्पतीला लांब देठ, जाड पाने आणि जांभळ्या रंगाची फुले असतात.

Water Hyacinth Godavari River | Sarkarnama

जलपर्णी एक उपयुक्त वनस्पती आहे, जी पाणी शुद्ध करण्यास मदत करते, परंतु तिची वाढ जर नियंत्रणाबाहेर झाली, तर ती जलप्रदूषण आणि इतर समस्या निर्माण करू शकते.

Water Hyacinth Godavari River | Sarkarnama

नाशिकच्या गोदावरी नदीमधील जलपर्णीचा विषय कायमचा बनला आहे. दरवर्षी मोठ्याप्रमाणात जलपर्णी वाढते. आताही गोदावरी नदी जलपर्णीच्या घट्ट विळख्यात आहे.

Water Hyacinth Godavari River | Sarkarnama

पाण्यातील ऑक्सिजन घटतो

जलपर्णी पाण्यावर एक थर तयार करते, ज्यामुळे पाण्यातील ऑक्सिजन कमी होतो आणि जलचर प्राणी मरतात.

Water Hyacinth Godavari River | Sarkarnama

पाण्याचा प्रवाह अडतो :

जलपर्णीच्या वाढीमुळे पाण्याचा प्रवाह अडतो, ज्यामुळे पाणी साठून राहते आणि पूर येण्याची शक्यता वाढते.

Water Hyacinth Godavari River | Sarkarnama

पाण्याची गुणवत्ता घटते :

जलपर्णी पाण्याचा रंग बदलून तिची गुणवत्ता घटवते.

Water Hyacinth Godavari River | Sarkarnama

रोगप्रसार :

जलपर्णीच्या वाढीमुळे डेंग्यू आणि मलेरियासारख्या डासांची पैदास होते, ज्यामुळे रोगप्रसार होण्याची शक्यता वाढते.

Water Hyacinth Godavari River | Sarkarnama

जीवविविधतेला धोका:

जलपर्णी इतर वनस्पती आणि प्राण्यांना वाढू देत नाही, ज्यामुळे जीवविविधतेला धोका निर्माण होतो.

Water Hyacinth Godavari River | Sarkarnama

शिवरायांचे गड किल्ले फिरा आता रेल्वेने, सरकारने आणली खास योजना

Chhtrapati shivaji maharaj | sarkarnama
येथे क्लिक करा