सरकारनामा ब्युरो
गोदावरीच्या पाण्यावरून आंध्र-प्रदेश आणि तेलंगणा या दोन राज्यांत नवा जलसंघर्ष निर्माण झाला आहे.
गोदावरीचं पाणी कृष्णा नदीमार्गे रायलसीमा भागात वळवण्याचा आंध्र प्रदेश सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.
दुष्काळग्रस्त रायलसीमा भागाला सिंचनाची सुविधा देणे आणि पाण्याच्या तुटवड्याचं समाधान करणे.
पोलावरम उजव्या कालव्याची क्षमता वाढवली जाईल.
बोल्लापल्ली जलाशयातून पाणी उचलून बनकचेरला जलाशयात नेले जाईल.
नल्लामला जंगलातून बोगदा.
मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी गोदावरी–कृष्णा–पेन्ना जोड प्रकल्पाची घोषणा केली आहे. “हे पाणी अतिरिक्त आहे, तेलंगणाच्या हिताला धोका नाही,” असं स्पष्टीकरण दिलं आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी हा प्रकल्प 2014 च्या कायद्याचा भंग असल्याचा आरोप केला आहे.
रेवंत रेड्डी यांनी केंद्रीय अर्थमंत्री आणि जलशक्ती मंत्र्यांना पत्र लिहून प्रकल्प थांबवण्याची मागणी केली आहे.
तेलंगणच्या स्थापनेवेळी तेलंगणचे पाणी आंध्र प्रदेशकडे वळविले जात आहे, असा आरोप होत होता. आता गोदावरीचे पाणी आंध्र प्रदेशकडे वळविण्यात आल्याचा आरोप करून तेलंगण याविरोधात उभा ठाकला आहे.
रायलसीमामधील टीडीपीचा प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न.
वायएसआर काँग्रेसचा प्रभाव कमी करणे.