Rashmi Mane
‘लाडकी बहिण’ योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सरकारकडून पुन्हा एकदा पडताळणी सुरू करण्यात आली असून अनेक महिलांना अपात्र ठरवले जात आहे. त्यामुळे राज्यातील लाखो लाडक्या बहिणींमध्ये सध्या नाराजी आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या योजनेचे बारा महिने पूर्ण झाले असून आतापर्यंत 12 हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. आता तेराव्या हप्त्याची प्रतीक्षा सुरू आहे.
गेल्या महिन्याचा हप्ता जुलैच्या पहिल्या आठवड्यात जमा झाला होता. मात्र अद्याप या महिन्याच्या हप्त्याची तारीख अधिकृत जाहीर झालेली नाही.
जुलै महिन्याचा हप्ता 31 जुलैच्या आत किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे.
या योजनेतील लाभार्थ्यांची पुन्हा पडताळणी सुरू असून अनेक महिलांना अपात्र ठरवले जात आहे. यामुळे राज्यातील लाखो लाडक्या बहिणींमध्ये सध्या नाराजी आहे.
याच नाराजीचा फटका आगामी स्थानिकमध्ये बसू नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिकच्या निवडणुकीपर्यंत नो चाळण, नो गाळण असे धोरण स्विकारले आहे. यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींना दिलासा मिळणाला आहे.
लाभार्थी महिलांच्या खात्यात सात-आठ दिवसात पैसे येण्याची शक्यता आहे. नाहीतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात खात्यात हप्ता नक्की जमा होईल.