Ganesh Sonawane
नाशिक विधानपरिषदेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्याविरोधात गोकुळ गिते यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
नरेंद्र दराडे यांचे पुत्र कुणाल यांनी आपल्या वडिलांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप गोकुळ गीते यांनी केला. बाप काढणाऱ्यांसाठी माघार नाही अशी भूमिका घेतली.
गोकुळ गीते हे नाशिक महापालिकेचे भाजपचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते यांचे सख्खे भाऊ आहेत.
बंधू गणेश गीते यांच्या संपूर्ण राजकीय वाटचालीत गोकुळ गीते यांचा पडद्यामागून मोठा हातभार राहिला आहे.
विधानसभा निवडणुकीत गणेश गीते यांनी राष्ट्रवादी (श.प) पक्षाकडून निवडणूक लढवली होती. या संपूर्ण निवडणुकीचे नियोजन आणि कॅम्पेन गोकुळ गीते यांनीच सांभाळले होते.
गोकुळ गीते हे पिंपळगाव बाजार समितीवर सलग दोन वेळा संचालक म्हणून निवडून आले आहेत.
गोकुळ गिते यांची सायखेडा गटातून जिल्हा परिषद निवडणुकीची पूर्वतयारी सुरू होती, ते आता विधानपरिषदेच्या रिंगणात उतरले आहेत.
जंगम मालमत्ता : ३ कोटी ३९ लाख ९८ हजार ७८६
स्थावर मालमत्ता : १३ कोटी २९ लाख २२ हजार ८००
जंगम मालमत्ता : ३ कोटी ४२ लाख ३६ हजार ३७४
स्थावर मालमत्ता : ५ कोटी ९८ लाख ७६ हजार ६७५ इतकी आहे