Jagdish Patil
गोकुळच्या अध्यक्षपदाची निवड आज पार पडली. या निवडणुकीत शासन नियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देण्यात आला होता.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीकडून माजी आमदार राजेश पाटील यांची निवड झाली.
मात्र, अध्यक्षपदाच्या निवडीत चर्चेच्या केंद्रस्थांनी असलेल्या शासन नियुक्त संचालकांबाबतची माहिती जाणून घेऊया.
राज्य सरकारने डॉ. प्रवीण हेंद्रे, शिवाजी आडनाईक, के. डी. पाटील आणि ॲड. प्रशांत पाटोळे यांची संचालकपदी नियुक्ती केली आहे.
डॉ. प्रवीणचंद्र हेंद्रे हे प्रसूतीशास्त्र आणि आयव्हीएफ क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर आहेत. त्यांना भाजपच्या कोट्यातून संधी देण्यात आली आहे.
शिवाजी आडनाईक हे पन्हाळा तालुक्यातील असून ते जिल्हा बँकेचे निवृत्त विभागीय अधिकारी आहेत. त्यांना राष्ट्रवादीकडून संधी देण्यात आली आहे.
शिवसेनेकडून कागल तालुक्यातील केनवडे येथील चार्टर्ड अकाउंटंट कृष्णात ज्ञानदेव पाटील यांना संचालक बनवण्यात आलं आहे.
सांगलीचे ॲड. प्रशांत भगवान पाटोळेंना जनसुराज्यच्या कोट्यातून संचालकपद मिळाले आहे. ते विविध सहकारी संस्थांचे कायदेशीर सल्लागार म्हणून काम पाहतात.
तर सांगलीतील व्यक्तीला संधी दिल्याने सतेज पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यात पात्र तज्ज्ञ मिळाला नाही का, असा सवाल उपस्थित केला.