बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 85,000 रुपयांपेक्षा अधिक पगार! आजचं करा अर्ज!

Rashmi Mane

करिअरची संधी

बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे.

एकूण पदसंख्या

बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) ने विविध व्यवस्थापकीय पदांसाठी एकूण 41 जागांवर भरती प्रक्रिया सुरू केली आहे.

अर्जाची अंतिम तारीख

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 23 जुलै 2025 पासून बँकेच्या अधिकृत वेबसाइट www.bankofbaroda.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 ऑगस्ट 2025 आहे.

भरली जाणारी पदे

  • मॅनेजर (डिजिटल प्रॉडक्ट) – 7

  • सीनियर मॅनेजर (डिजिटल प्रॉडक्ट) – 6

  • फायर सेफ्टी ऑफिसर – 14

  • मॅनेजर/सीनियर मॅनेजर/चीफ मॅनेजर (IT सुरक्षा व स्टोरेज)

पात्रता

या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता अधिकृत अधिसूचनेमध्ये दिलेली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी ती काळजीपूर्वक वाचावी.

अर्ज शुल्क

सामान्य/OBC/EWS वर्गासाठी : 850.

SC/ST/महिला/दिव्यांग/Ex-Servicemen वर्गासाठी 175

शुल्क फक्त ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जाईल.

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड ऑनलाईन लेखी परीक्षा, मानसशास्त्रीय चाचणी (Psychometric Test) व इतर मूल्यमापन प्रक्रियेद्वारे केली जाईल. त्यानंतर यशस्वी उमेदवारांना ग्रुप डिस्कशन आणि मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

Next : निवृत्त पोलिसांना मिळणार अखेरचा सन्मान; पोलीस महासंचालकांचा अंत्यसंस्कारावर महत्वाचा निर्णय

येथे क्लिक करा