Rashmi Mane
पोलिस दलाने एक विशेष कार्यप्रणाली जारी केली आहे. पोलिस दलातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या निधनानंतर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार केले जावेत, असा निर्णय राज्य पोलिस दलाने घेतला आहे.
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी ही कार्यप्रणाली संपूर्ण राज्यभर लागू करण्याचे निर्देश दिले असून, यामुळे सेवानिवृत्त पोलिसांच्या योगदानाला मान्यता मिळणार आहे.
सध्या पोलिस दलातून सेवानिवृत्त झाल्यावर संबंधित विभागात त्यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत निरोप समारंभ घेतला जातो. मात्र त्यानंतर सेवानिवृत्त पोलिसांचा पुढील तपशील अद्ययावत ठेवला जात नाही.
नोकरी संपल्यानंतरही पोलिसांची माहिती अद्ययावत ठेवण्याचे आदेश पोलीस विभागांना देण्यात आले आहेत.
प्रत्येक विभागात माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी समन्वय अधिकारी नेमले जाणार आहेत.
वयोमानानुसार, वैद्यकीय कारणाने किंवा स्वेच्छानिवृत्त झालेले तसेच निवृत्त वेतनधारक अधिकारी यांना ही सन्मानाची संधी मिळणार.
सेवानिवृत्त पोलिसाच्या अंत्यसंस्कारास संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने गणवेशात उपस्थित राहण्याचे आदेश. महासंचालक दर्जाच्या पोलिसाला ‘गार्ड ऑफ ऑनर’ आणि शोक बिगुल देण्यात येणार.