Rashmi Mane
सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
भारत सरकारच्या प्रमुख बँकांपैकी एक असलेल्या नॅशनल बँक फॉर अॅग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (NABARD) मध्ये विविध स्पेशालिस्ट पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज प्रक्रिया 16 जून 2025 पासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून 2025 आहे.
डेटा सायंटिस्ट / AI इंजिनियर
डेटा इंजिनियर
डेटा सायंटिस्ट कम BI डेव्हलपर
स्पेशालिस्ट (इतर विविध विभागांमध्ये)
उमेदवारांकडे BE/B.Tech किंवा ME/M.Tech/MCS (कम्प्युटर सायन्स, IT, डेटा सायन्स, मशीन लर्निंग, AI) या शाखांतील पदवी असणे आवश्यक आहे.
डेटा मॅनेजमेंटसाठी कोणत्याही विषयातील मास्टर्स पदवी आवश्यक आहे.
संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक आहे.
डेटा सायंटिस्ट / AI इंजिनियर: 21 लाख – 30 लाख वार्षिक
डेटा इंजिनियर: 18 लाख – 27 लाख वार्षिक
डेटा सायंटिस्ट कम BI डेव्हलपर: 15 लाख – 21 लाख
स्पेशालिस्ट पदे: 12 लाख – 15 लाख
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 25 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे.
या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. उमेदवारांची निवड थेट मुलाखतीच्या व अनुभवाच्या आधारे केली जाणार आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी NABARD ची अधिकृत वेबसाइट www.nabard.org या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करावा.