Rashmi Mane
रेल्वेमध्ये 2 हजार 865 पदांसाठी मोठी भरती निघाली होती. या पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आज बंद होणार आहे.
त्यामुळे इच्छुक तरुणांनी आपला अर्ज त्वरित ऑफिशियल वेबसाइट nitplrrc.com वर जाऊन भरावा.
या भरतीद्वारे उमेदवारांना विविध विभागांमध्ये अप्रेंटिस पदावर नियुक्त केले जाईल.
अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वयमर्यादा किमान 15 वर्षे आणि जास्तीत जास्त 24 वर्षे ठरवण्यात आली आहे.
SC/ST उमेदवारांना अधिकतम वयात 5 वर्षांची सूट.
OBC उमेदवारांना 3 वर्षांची सूट.
PWD उमेदवारांना 10 वर्षांची सूट.
शैक्षणिक पात्रतेबाबत, उमेदवारांनी 10वी किंवा 12वी पास केलेली असावी आणि किमान 50% गुण मिळालेले असावे. तसेच, अर्जदाराकडे संबंधित ट्रेडमध्ये ITI सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.
अर्ज शुल्काबाबत, सामान्य उमेदवारांना 141 रुपये भरावे लागतील. SC/ST/PWD/महिला उमेदवारांसाठी शुल्क फक्त 41 रुपये आहे.
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत नोटिफिकेशन नीट वाचावे आणि पात्रता व शैक्षणिक अर्हतेची माहिती तपासावी. 10वी-12वी उत्तीर्ण तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवारांनी विलंब न करता अर्ज करावा, कारण शेवटची तारीख आज आहे.