Rashmi Mane
यंदाच्या आर्थिक वर्षासाठी आयकर विवरणपत्र (ITR) फाइल करण्यास सुरुवात झाली आहे. अनेकांनी ITR फाइलही केले आहे.
ज्यांनी लवकर ITR फाइल केलंय, त्यांना रिफंडही मिळायला सुरुवात झाली आहे.
यंदा ITR फाइल करण्याची शेवटची तारीख 31 जुलै नसून 15 सप्टेंबर 2025 करण्यात आली आहे.
ज्यांना ऑडिट लागणार नाही, अशा व्यक्तींसाठी शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2025 आहे.
ज्यांना खात्यांचे ऑडिट करणे आवश्यक आहे, अशा कंपन्यांसाठी ITR फाइलची डेडलाइन 31 ऑक्टोबर 2025 आहे.
ऑडिट लागणाऱ्यांसाठी रिपोर्ट जमा करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2025 आहे.
ज्यांचा व्यवहार आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा आहे, त्यांनी ITR 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत फाइल करणे आवश्यक आहे.
जर वेळेत ITR फाइल केला नाही, तरी बिलेटेड ITR फाइल करता येतो. पण उशीर कशाला वेळेत ITR भरा शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025.