Rashmi Mane
रेल्वे कर्मचार्यांसाठी मोठी खुशखबर आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ आपल्या पुढील बैठकीत दिवाळी बोनस मंजूर करण्यात आला आहे.
सरकारी सूत्रांनी सांगितले की, केंद्रीय मंत्रिमंडळ दिवाळी आधी बोनस मंजूर करण्यात आला आहे.
हा बोनस मुख्यतः गैर-गजेटेड कर्मचार्यांना दिला जातो.
गेल्या वर्षी 11 लाख कर्मचार्यांना हा बोनस मिळाला होता.
रेल्वे कर्मचारी संघटनांनीदेखील बोनस वाढवण्याची मागणी केली आहे. भारतीय रेल्वे कर्मचारी महासंघ (IREF) आणि अखिल भारतीय रेल्वे कर्मचारी संघ (AIRF) यांनी बोनसाची गणना सातव्या वेतन आयोगानुसार करावी, असे सरकारकडे सुचवले आहे.
सध्याचा बोनस 6व्या वेतन आयोगाच्या आधारावर दिला जातो. पण रेल्वे कर्मचारी युनियन्स सातव्या वेतन आयोगानुसार बोनस वाढवण्याची मागणी करत आहेत.
दिवाळीच्या आधी रेल्वे कर्मचार्यांसाठी सरकारकडून आर्थिक दिलासा मिळणार आहे, लवकरच याची घोषणा होऊ शकते!