Rashmi Mane
मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनात लोकलचं अविभाज्य असं स्थान आहे. लोकलला मुंबईकरांची ‘लाईफलाइन’ म्हटलं जातं आणि दररोज लाखो प्रवासी या रेल्वेवर अवलंबून असतात.
दररोज लाखो प्रवाशांना ने-आण करणारी लोकल आता होणार आणखी जलद आणि सोयीस्कर होणार आहे.
आता रेल्वे प्रशासनाने लोकल प्रवाशांसाठी मोठा बदल करण्याची तयारी केली आहे. दर 3 मिनिटांनी लोकल ट्रेन धाववण्याचा महत्वाकांक्षी प्रस्ताव पुढे आला आहे.
सध्या मुंबई उपनगरीय मार्गावर एकूण 1810 लोकल गाड्या धावत आहेत. गर्दी कमी करण्यासाठी आणि प्रवाशांना अधिक सोयीची सेवा देण्यासाठी ही संख्या वाढवून 5000 गाड्यांपर्यंत नेण्याचा विचार आहे.
या प्रस्तावामुळे उपनगरीय रेल्वेला लहान झोनमध्ये विभागले जाणार आहे. ज्यामुळे दोन रेल्वेमधील वेळ कमी होईल, वेळापत्रक सुधारेल.
या प्रस्तावामुळे प्रवाशांना मोठा फायदा होणार असून गर्दीपासून मोठी सुटका होणार आहे. तसेच प्रवासात सुरक्षितता वाढेल आणि अपघातांची शक्यता कमी होईल.
याशिवाय, प्रत्येक ट्रेनचं फेऱ्यांचं चक्र 30 ते 45 मिनिटांत पूर्ण होऊ शकेल. त्यामुळे टाईमटेबल अधिक अचूक आणि वेगवान होईल.
दर तीन मिनिटांनी लोकल उपलब्ध झाल्यास प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर होणार आहे.
मुंबईकरांसाठी ही योजना अमलात आली तर लोकल प्रवासाचा अनुभव अधिक आरामदायी होईल आणि प्रवाशांची मोठी वर्षानुवर्षांची समस्या सुटण्याची शक्यता आहे.