Rashmi Mane
Senior Citizens Scheme 2025 : 60 वर्षांवरील व्यक्तींसाठी पोस्ट ऑफिसची ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) ही केंद्र सरकारकडून चालवली जाणारी विश्वसनीय योजना.
या योजनेत एकदाच ठराविक रक्कम गुंतवली जाते आणि त्यावर दरमहा निश्चित व्याज मिळतं म्हणजे दरमहा 6,000 रुपयापर्यंत उत्पन्नाची संधी!
SCSS मध्ये व्याजदर तुलनात्मकदृष्ट्या जास्त असून दरवर्षी सरकार ठरवते. सध्या सुमारे 8.2% व्याजदर लागू आहे.
किमान गुंतवणूक: 1,000 रुपये
कमाल गुंतवणूक: 30 लाख रुपये
योजना कालावधी: 5 वर्षे (3 वर्षांनी वाढवण्याची मुभा).
जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन फॉर्म भरा.
आवश्यक कागदपत्रं: आधार, पॅन कार्ड, वयाचा पुरावा.
तज्ज्ञ कर्मचाऱ्यांकडून मार्गदर्शन मिळतं.
SCSS अंतर्गत गुंतवणुकीसाठी कलम 80C अंतर्गत आयकर सवलत मिळते. यामुळे आर्थिक बचतीचा दुहेरी फायदा होतो.
व्याजाची रक्कम दर महिन्याला थेट तुमच्या खात्यात जमा केली जाते. पारदर्शक, सोपी आणि सरकारची हमी असलेली योजना.
निवृत्तीनंतरचा काळ बनवा निश्चिंत, सुरक्षित आणि स्वावलंबी. SCSS ही योजना तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी ठरू शकते!