Rashmi Mane
समृद्धी महामार्गाचं आज 5 जून 2025 ला उर्वरित आणि अखेरच्या 76 किमी टप्प्याचे लोकार्पण झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदेंनी समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केले.
यामुळे नागपूर ते मुंबई प्रवास आता अवघ्या 8 तासांत करता येणार आहे. हा महामार्ग मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, वर्धा, नागपूरसह 10 जिल्ह्यांना थेट जोडतो.
सामान्य कारधारकाला आता नागपूर ते मुंबई टोलसाठी 1,445 रूपये मोजावे लागणार.
1 एप्रिल 2025 पासून नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील टोल दरात तब्बल 19% वाढ करण्यात आली आहे.
कार/हलकी वाहने: 2.06 रुपये प्रति किमी
मिनी ट्रक/बस: 3.32 रुपये प्रति किमी
मोठे ट्रक/बस: 6.97 रुपये प्रति किमी
ट्रेलर/बांधकाम वाहने: 10.93 रुपये प्रति किमी
मोठी वाहने (7+ एक्सेल): 13.30 रुपये प्रति किमी
उर्वरित आणि अखेरच्या 76 किमी टप्प्याचे लोकार्पण झाले. यामुळे आता मुंबई ते नागपूर प्रवास अवघ्या 8 तासांत गाठता येणार आहे.
महामार्ग बांधताना सर्व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून तो पूर्णपणे सुसज्ज आहे. सीसीटीव्ही, इमर्जन्सी कॉल बॉक्स, ट्रॅफिक मॉनिटरिंग यंत्रणा असल्यामुळे प्रवाशांची सुरक्षितता अबाधित राहणार आहे.
हा महामार्ग केवळ प्रवासच नाही, तर औद्योगिक, आर्थिक आणि सामाजिक विकासालाही नवा गती देणार आहे.