केवायसी नाही केली तर रेशन बंद? तात्काळ करा ही सोपी प्रक्रिया

Rashmi Mane

रेशन कार्ड

भारतीय नागरिकांसाठी रेशन कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र आहे. त्यामुळे यासाठी आता केवायसी (KYC) करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Ration Card | Sarkarnama

KYC च्या दोन पद्धती

रेशन कार्डधारकांनी वेळेत केवायसी न केल्यास त्यांचे कार्ड निष्क्रिय होऊ शकते आणि मोफत धान्य मिळणे थांबू शकते. सध्या केवायसी करण्यासाठी दोन पद्धती उपलब्ध आहेत – ऑनलाइन आणि ऑफलाइन.

Ration Card | Sarkarnama

ऑफलाइन पद्धत:

  • जवळच्या रेशन दुकानावर भेट द्या.

  • आधार कार्ड सोबत घेऊन जा.

  • दुकानदार पीओएस मशीनद्वारे बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करेल.

  • यानंतर केवायसी पूर्ण होईल.

Ration Card | Sarkarnama

ऑनलाइन केवायसी सुरू करण्यासाठी काय लागेल?

Mera KYC App
Aadhaar FaceRD App
हे दोन्ही अॅप डाउनलोड करा.

E-KYC for ration card | sarkarnama

ऑनलाइन पद्धत

  1. ‘Mera KYC’ आणि ‘Aadhaar FaceRD’ हे अॅप्स मोबाईलवर डाउनलोड करा.

  2. आपले लोकेशन आणि राज्याची माहिती भरा.

  3. आधार क्रमांक, कॅप्चा कोड आणि ओटीपी टाका.

  4. स्क्रीनवर आधार माहिती दिसेल.

ration shop commission increase

e-KYC होईल पूर्ण

  1. ‘Face e-KYC’ हा पर्याय निवडा.

  2. कॅमेराद्वारे चेहरा स्कॅन करा आणि फोटो सबमिट करा.

  3. यानंतर तुमचे ई-केवायसी पूर्ण होईल.

ration shop commission increase | Sarkarnama

केवायसी झाली की नाही ते कसे तपासायचे?

Mera KYC App उघडा.
लोकेशन व आधार क्रमांक टाका.
Status: Y = KYC पूर्ण, N = KYC बाकी इतकी सोपी प्रक्रिया.

ration shop commission increase

Next : शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारची भन्नाट योजना; वयाची 60 गाठताच मिळणार 3000 पेन्शन! 

येथे क्लिक करा