Satish Maneshinde : मराठ्यांची बाजू कोर्टात मांडणारे दिग्गज वकील सतीश मानेशिंदे कोण?

Rashmi Mane

मनोज जरांगे पाटील आंदोलन

जरांगेंच्या या आंदोलनाविरोधात दाखल याचिकेवर आज सुनावणी झाली आहे. या आंदोलनात मराठ्यांनी ताकद लावली असून, कोर्टात मोठा वकील मैदानात उतरला आहे.

मराठ्यांची बाजू कोण मांडणार?

या खटल्यात मराठा आंदोलकांची बाजू मांडण्यासाठी देशातील दिग्गज क्रिमिनल वकील सतीश मानशिंदे मैदानात उतरले आहेत.

सतीश मानशिंदे कोण आहेत?

देशातील हाय-प्रोफाईल क्रिमिनल वकील म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी बॉलीवूडपासून राजकारणापर्यंत अनेक नामांकित प्रकरणे त्यांनी हाताळली आहेत.

बॉलीवूडशी नाते

1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात संजय दत्त यांची बाजू मांडल्यामुळे ते चर्चेत आले. त्यानंतर 2002 मध्ये सलमान खानच्या काळवीट शिकार आणि ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अलिकडच्या काळात सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा खटला हाताळल्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले.

शैक्षणिक प्रवास

कर्नाटकमधील धनोआ हे त्यांचे मूळ गाव. इथेच त्यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण केले.

करिअरची सुरुवात

1983 साली वकिलीची सुरुवात करताना त्यांनी जवळपास दहा वर्षे दिग्गज वकील राम जेठमलानी यांच्याकडे असिस्टंट म्हणून काम केले.

प्रसिद्धी कशी मिळाली?

1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात संजय दत्त यांना जामिन मिळवून दिल्याने मानशिंदे देशभर चर्चेत आले होते.

Next : जरांगेंच्या आंदोलनाला परवानगी नाही, 'या' नियमांचे उल्लंघन हायकोर्टात सरकारने काय सांगितलं?

येथे क्लिक करा