Deepak Kulkarni
देशभरात नीटच्या परीक्षेचा पेपरफुटल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
नीट यूजी परीक्षा पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने 13 आरोपींविरुद्ध 20 हजार पानांचे मोठे आरोपपत्र दाखल केले आहे.
सीजेपीच्या दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलनानंतर परीक्षा प्रणालीत पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र सरकारने 'एनटीए' (NTA) मधून 600 तज्ज्ञांची तडकाफडकी हकालपट्टी केली आहे.
परीक्षा पेपरफुटीनंतर अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे गुगलच्या नव्या शैक्षणिक AI सुविधांची माहिती दिली.
या नव्या पोस्टमधून दिलेल्या माहितीनुसार, गुगल सर्च, जेमीनी, युट्युब आणि इतर एज्युकेशन टूल्सच्या मदतीने विद्यार्थ्यांना आपल्या आवश्यकतेनुसार अभ्यास करता येणे शक्य होणार आहे.
विद्यार्थ्यांना यापुढील काळात नीट यांसह अनेक परीक्षांची तयारी करताना टूल्सच्या माध्यमातून अभ्यास, सराव आणि विषय समजून घेण्यास मदत होणार आहे.
गुगलने मोफत एआय सब्सक्रिप्शनबाबतची 140 हून जास्त देशांमधील कॉलेज विद्यार्थ्यांसाठी घोषणा केली आहे.
पिचाई यांनी केलेल्या घोषणेनंतर भारतामधील पात्र कॉलेज विद्यार्थ्यांना 12 महिन्यांसाठी गुगल एआय प्लस मोफत दिली जाणार आहे.
याशिवाय एआय प्रो आणि यू ट्युब प्रिमियमचे सबस्क्रिप्शन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 70 टक्क्यांपर्यंत सवलत मिळण्याची शक्यता आहे.