नाशिक महापालिकेच्या लोगोमध्ये नारोशंकराची घंटा का आहे?

Ganesh Sonawane

नाशिक महापालिकेच्या लोगोमध्ये घंटा का?

नाशिक महापालिकेच्या बोधचिन्हात तुम्हाला एक ऐतिहासिक घंटा पाहायला मिळते.
हीच प्रसिद्ध नारोशंकराची घंटा असून ती नाशिकच्या ऐतिहासिक ओळखीचा महत्त्वाचा भाग आहे.

Nashik Municipal Logo Naroshankar Bell

ही घंटा नाशिकची नव्हती!

नारोशंकराची घंटा मूळची नाशिकची नव्हती, तर ती पोर्तुगीजांच्या ताब्यातील वसई येथे होती. वसईच्या ऐतिहासिक लढाईनंतर ही घंटा नाशिकमध्ये आणली गेली.

Nashik Municipal Logo Naroshankar Bell

मराठ्यांच्या विजयाची आठवण

मराठ्यांनी वसईवर विजय मिळवल्यानंतर ही घंटा नाशिकमध्ये आणण्यात आली.
त्यामुळे ही घंटा मराठ्यांच्या शौर्य, पराक्रम आणि विजयाचे प्रतीक मानली जाते.

Nashik Municipal Logo Naroshankar Bell

पंचवटीतील नारोशंकर मंदिरावर विराजमान


नाशिकमध्ये आणल्यानंतर ही घंटा पंचवटीतील नारोशंकर मंदिरावर बसवण्यात आली.
तेव्हापासून ती ‘नारोशंकराची घंटा’ या नावाने प्रसिद्ध झाली आणि नाशिकच्या ओळखीचा भाग बनली.

Nashik Municipal Logo Naroshankar Bell

घंटेवर कोरलंय १७२१ वर्ष!

या ऐतिहासिक घंटेवर १७२१ हे वर्ष कोरलेले असल्याचे सांगितले जाते.
म्हणजेच या घंटेचा इतिहास तब्बल तीनशे वर्षांहून अधिक जुना आहे.

गोदावरीच्या पुराचा इशारा देणारी घंटा


गोदावरीला मोठा पूर आला की पाण्याची पातळी घंटेपर्यंत पोहोचत असे.
पाण्याच्या लाटांमुळे घंटेचा लोलक हलून आवाज होत असे आणि नाशिककरांना पुराच्या पाण्याची पातळी समजत असे.

Nashik Municipal Logo Naroshankar Bell

घंटेचा आवाज कित्येक किलोमीटरपर्यंत!


पाण्यामुळे घंटानाद झाल्यानंतर त्याचा आवाज दूरपर्यंत, सुमारे तीन किलोमीटरपर्यंत ऐकू जात असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे ही घंटा केवळ ऐतिहासिक वारसा नव्हती, तर पूर्वीच्या काळात पुराच्या धोक्याचा संकेत देणारे साधनही होती.

Nashik Municipal Logo Naroshankar Bell

नाशिकचा ‘मानबिंदू’ म्हणून लोगोमध्ये स्थान

नारोशंकराची घंटा ही नाशिकच्या इतिहास, संस्कृती आणि मराठ्यांच्या पराक्रमाची ओळख आहे. म्हणूनच नाशिक महापालिकेच्या बोधचिन्हात या घंटेचा समावेश करण्यात आला असून, महापालिकेच्या अधिकृत कागदपत्रांवरही तिचे चित्र पाहायला मिळते.

Nashik Municipal Logo Naroshankar Bell

NEXT : रेल्वेत RAC तिकिटावरही मिळणार आता बेडशीट, चादर

येथे क्लिक करा